आमचा वाटा

सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?

सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?

घाम शेतात आमचा गळे,

चोर ऐतच घेऊन पळे

धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?

न्याय वेशीला टांगा सदा,

माल त्याचा की आमचा वदा

करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?

लोणी सारं तिकडं पळं,

इथं भुकेनं जिवडा जळं

दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?

इथ बिऱ्‍हाड उघड्यावर,

तिथं लुगडी लुगड्यावर

या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?

इथं मीठ मिरची अन् तुरी,

तिथं मुरगी काटा सुरी

सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?

शोधा सारे साठे चला,

आज पाडा वाडे चला

वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?

लोकशाहीर वामनदादा कर्डक

Advertisements

गोरी गोरीपान, फुलासारखी छान

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्या गोर्या वहीनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण

वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ, दोघी आम्ही सान